
वैशाख पौर्णिमेला साजरा झाला “शहाळे महोत्सव” वैशाख पौर्णिमेचे निमित्त साधत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा गाभारा शहाळ्यांनी सजवण्यात आला होता.शेकडो शहाळ्यांच्या मध्ये विराजमान असलेल्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर या शहाळ्यांचे वाटप ससून रुग्णालयातील रुग्णांना करण्यात आले.