ऋषिपंचमी निमित्त ‘ऑनलाईन अथर्वशीर्ष पठण’

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गणेशोत्सवातील महत्वाचा कार्यक्रम म्हणजे ऋषिपंचमी निमित्त होणारे महिलांचे अथर्वशीर्ष पठण. हजारो महिला या कार्यक्रमात सहभागी होतात आणि अथर्वशीर्षाचे पठण करून एक मंगल वातावरण निर्माण करतात. दुर्दैवाने या वर्षी कोरोना या रोगाच्या साथीने हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या करणे शक्य नाही.

पण म्हणून अथर्वशीर्ष पठण थांबणार नाही! हे पठण या वर्षी होईल ‘ऑनलाईन माध्यमातून’.

ऋषिपंचमीच्या दिवशी, २३ ऑगस्ट २०२०, सकाळी ६ वाजता ऑनलाईन माध्यमातून अर्थात आमच्या YouTube चॅनलद्वारे बाप्पांचे मंदिरातून थेट दर्शन घेत स्वगृही अथर्वशीर्ष पठण करून या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/c/dagdushethganpati

मंदिरात किंवा उत्सव मंडपात जात आले नाही म्हणून काय झाले बाप्पांची सेवा व आराधना स्वगृहीही होऊ शकते कारण बाप्पा आपल्या मनात आहेत.

चला तर मग या कठीण काळात या लाईव्ह पठणाद्वारे बाप्पाची आराधना करू आणि साकारत्मकता जागवू.

बाप्पाला प्रार्थना करू की हे संकट लवकरात लवकर टळू दे.

खाली दिलेला फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करा व या पठणात सहभागी व्हा! रजिस्टर केल्यानंतर या कार्यक्रमाचे रिमाइंडर व इतर अपडेट्स तुम्हाला दिले जातील.

खाली दिलेला फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करा.

मंदिरात नित्य नेमाने अभिषेक केला जातो. मंदिरातील अभिषेकाचे बुकिंग करायचे असल्यास खालील बटणावर क्लिक करा.

ट्रस्टतर्फे केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यांसाठी देणगी द्यावयाची असल्यास खालील बटणावर क्लिक करा.