ट्रस्टतर्फे केली जाणारी सामाजिक कार्ये

ग्रामीण भागात ट्रस्टकडून मदतीचा ओघ!

खामगाव येथील निराधार महिलांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण युग तरुण मंडळ यांच्या वतीने महिनाभर पुरेल एवढा धान्यसाठा पुरविण्यात आला आहे.

आदिवासी पाड्यावर धान्य वाटप!

सध्याच्या लॉकडाऊनच्याकाळात समाजातील गरजू घटकांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने मदतीचे कार्य सतत चालू आहे.

निर्भया संस्थेच्या मागणीला ट्रस्टची कृतीशील दाद.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने शंभरहून अधिक तृतीयपंथीयांसाठी धान्याचे वाटप करण्यात आले.

पिताश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक ‘ठणठणीत’!

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या कोंढवा येथील पिताश्री वृद्धाश्रमात पुणे महापालिकेच्या वैद्यकीय पथकाने सर्व ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली.

वृद्धाश्रमात घेतली जातेय ज्येष्ठ नागरिकांची काळजी!

पिताश्री वृद्धाश्रमात कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांची योग्य ती काळजी घेतली जात आहे.

गरजू लोकांना धान्य वाटप

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पुण्यातील बिबवेवाडी-कोंढवा रोड येथील आनंदनगरमधील मार्केट येथील गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले.

वाटचाल देवमंदिरातून मानवतेच्या महामंदीराकडे!

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने पुण्यातील कासेवाडी येथील रहिवाशांना प्रत्येक कुटुंबाला साबणाच्या पाच वड्या याप्रमाणे एक हजार कुटुंबांना पाच हजार डेटॉल साबणाच्या वड्यांचे वाटप करण्यात आले.

ट्रस्टकडून भटक्या प्राण्यांनाही आधार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पशूखाद्य उपलब्ध करून देण्यात येत आहे

जय गणेश स्वयंपूर्ण ग्राम अभियान

ट्रस्टतर्फे पिंगोरी हे दुष्काळग्रस्त घेण्यात आले असून गावकऱ्यांच्या सहभागाने शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठीची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.

वारकरी सेवा

ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. उपक्रमाचा भाग म्हणजे वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप.

सुवर्णयुग कोऑपरेटिव्ह बँक

ट्रस्टतर्फे सुरु करण्यात आलेली सुवर्णयुग कोऑपरेटिव्ह बँक ही यशस्वीपणे सुरु असून आर्थिक व सामाजिक उन्नयनासाठी कार्यरत आहे.

जलसंवर्धन अभियान

या अभियानांतर्गत खडकवासला जलाशयातील गाळ काढण्याचे काम ट्रस्ट पुण्यातील इतर ३०० गणेशोत्सव मंडळांच्या सोबत सातत्याने करत आहे.

इ – लर्निंग

ग्रामीण भागातील ६५ शाळांमधील मुलांना कॉम्पुटरद्वारे शालेय शिक्षण दिले जाते. या सेवेचा लाभ आजतागायत सुमारे २५,००० विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळाला आहे.

संगीत महोत्सव

ट्रस्टतर्फे गुढी पाडवा ते रामनवमी या काळात संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. जागतिक ख्यातीचे कलाकार या महोत्सवात आपली कला सादर करतात.

पिताश्री वृद्धाश्रम

कोंढव्याच्या निसर्गरम्य परिसरात ट्रस्टतर्फे ‘पिताश्री’ या नावाने वृद्धाश्रम सुरु केला आहे. विविध सोयींनी हे आश्रम परिपूर्ण आहे.

जय गणेश व्होकेशनल जुनिअर कॉलेज

११ व १२ मधील विद्यार्थ्यांसाठी कोंढव्यामध्ये हे जुनिअर कॉलेज ट्रस्टतर्फे सुरु करण्यात आले आहे. निपुण तंत्रज्ञ घडविण्यासाठी हे कॉलेज प्रयत्नशील आहे.

सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब

कौशल्यपूर्ण खेळाडू घडविण्यासाठी सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लबची निर्मिती ट्रस्टतर्फे केली गेली आहे. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी हे क्लब कार्यरत आहे.

जय गणेश आपत्ती निवारण अभियान

निसर्ग संवर्धन अभियानांतर्गत प्रत्येकी ३०० चौरस फुटांची जागा इंदापूर मधील निमगावकेतकी येथील नैसर्गिक आपत्तीने पीडित १२ शेतकऱ्यांना देण्यात आली.

शौर्यगौरव पुरस्कार

देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या पत्नी, माता आणि त्यांच्या कुटुंबांचा गौरव या पुरस्कराने केला गेला.

गणपती नगर

सिंहगड रोडवर राहणाऱ्या १०० वीटभट्टी कामगारांना पक्की घरे देण्यात आली.

मोफत ऍम्ब्युलन्स सेवा

ट्रस्टतर्फे मोफत ऍम्ब्युलन्स सेवा पुरवली जाते. पुणे महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व रुग्णांना ट्रस्टतर्फे हि सेवा पुरविण्यात येते. या क्षेत्राबाहेर असणारे रुग्ण इंधनासाठीचे पैसे भरून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर

राज्य व केंद्र मान्य इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर ची निर्मिती ट्रस्टतर्फे केली गेली आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी हा उपक्रम सुरु केला गेला असून सुमारे १०० विद्यार्थ्यांना शिकवण्याची क्षमता या सेंटरमध्ये आहे.

जय गणेश आपत्ती निवारण अभियान

निसर्ग संवर्धन अभियानांतर्गत प्रत्येकी ३०० चौरस फुटांची जागा इंदापूर मधील निमगावकेतकी येथील नैसर्गिक आपत्तीने पीडित १२ शेतकऱ्यांना देण्यात आली. आपत्तीनंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी हा उपक्रम राबवला गेला.

गणपती सदन शैक्षणिक संकुल

मोफत अभ्यास वर्ग, कॉम्पुटर प्रशिक्षण इत्यादी मंदिराजवळच्या जागेत विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रस्ट सदैव तत्पर असतो.

चातुर्मासानिमित्त कीर्तन

चातुर्मासानिमित्त ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाचे आयोजन दरवर्षी केले जाते.

विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॅम्प

विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे मेडिकल कॅम्प ट्रस्टतर्फे सातत्याने घेतले जातात. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरता ट्रस्ट प्रयत्नशील असतो.

जय गणेश रुग्णसेवा अभियान

ससून हॉस्पिटल हे १०० वर्ष जुने आहे. येथे असणाऱ्या १२०० बेड्स वरील रुग्णांना दोन वेळेचे शुद्ध सात्विक शाकाहारी जेवण, अल्पोपहार व चहा कॉफी, बिस्किटे सप्टेंबर २०१३ पासून ट्रस्टतर्फे शिध्याच्या रूपात दिले जाते. गरोदर महिलांच्या ५ वॉर्ड्सचे संपूर्ण नूतनीकरण, नवजात शिशूंसाठी सुमारे ३९ incubators असणाऱ्या अतिदक्षता विभागाची निर्मिती, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्रांतीगृहाची व्यवस्था, सुमारे ५००० sq. ft च्या स्वयंपाकघराचे नूतनीकरण इत्यादी कामे ट्रस्टतर्फे केली गेली आहेत.

ट्रस्टतर्फे केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक कार्यांची माहिती घेण्यासाठी वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला जातो. आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून हा अहवाल भाविकांना मिळू शकतो.
सामाजिक कार्यांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क : [email protected]

तुम्हालाही यापैकी कोणत्या सामाजिक कार्यासाठी देणगी द्यायची असेल तर खालील अर्ज भरा. आमचे कारकर्ते तुम्हाला त्या संदर्भात संपर्क करतील.

    Your Name (required)

    Your Email (required)

    Subject

    Your Message