तारीख | कार्यक्रम | वेळ |
---|---|---|
बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ | श्रींची आगमन मिरवणूक | सकाळी ८.३० वाजता |
बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ | श्रींची प्राणप्रतिष्ठापना | सकाळी ११.११ मि. |
बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ | पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विद्युत रोषणाईचे उदघाटन | सायंकाळी ७.०० वाजता |
बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ | गणेशयाग (उत्सव मंडप) शुभारंभ | १.०० वाजता |
गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ | ३५००० माता भगिनींचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण | सकाळी ६.०० वाजता |
गुरुवार, दि. २८ ऑगस्ट २०२५ | हरी जागर | रात्री १० ते १२ पर्यंत |
गुरुवार, दि. २८ ऑगस्ट ते शुक्रवार, दि.५ सप्टेंबर २०२५ | दैनंदिन अभिषेक पूजा | सकाळी ७.०० ते सायं. ५.०० पर्यंत |
शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ | सामूहिक सूर्यनमस्कार | सकाळी ६.०० वाजता |
शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ | सामूहिक अग्निहोत्र | सकाळी ६.०० ते ७.०० पर्यंत |
बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ | मंत्र जागर (भागवत एकादशी) | दुपारी ४.०० वाजता |
शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ | सत्यविनायक पूजा | सायं. ४.०० ते ६.०० |
शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ | हळदी-कुंकू | सायं. ६.०० ते ८.०० |
शनिवार, दि. ६ सप्टेंबर २०२५ | विसर्जन मिरवणूक | दु. ४ वाजता |
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा कोट्यवधी
भाविकांचे श्रद्धास्थान आहे.यावर्षी गणेशोत्सवाला १३३ वर्ष होत आहेत . प्रतिवर्षी आपण देशातल्या
विविध मंदिर आणि राजप्रासाद यांच्या प्रतिकृती देखाव्याचा स्वरूपामध्ये करत आलेलो आहोत. त्याने
भारतातल्या विविध आणि समृद्ध संस्कृतीचा परिचय हा इथल्या लोकांना होत असतो आणि इथल्या लोकांचा आणि
त्या त्या राज्यातल्या लोकांचा एक भावनिक बांध आधिक द्दढ होत असतो या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षी
आपण केरळ राज्यातील श्री पद्मनाभस्वामी मंदिर ज्या मंदिराच्या लौकिक संपूर्ण जगभर आहे हे मंदिर
सजावटीच्या स्वरूपामध्ये साकारलेला आहे आणि हि सजावट त्याला रोषणाई चा विशेष साध असणार आहे. यामध्ये
गणपती बाप्पांच विलोभनीय मखर आणि त्या मखराच्या वर श्री पद्मनाभस्वामींची शेषशाही सैयास्वरूपी
मूर्ती विराजमान होणार आहे त्यामुळे ते विशेष आकर्षणाचा विषय भक्तांसाठी ठरणार आहे या निमित्तानी
सर्व गणेशभक्तांना यंदाच्या गणेशत्सवाच हार्दिक निमंत्रण. आपण याव, बाप्पांचा दर्शन घ्याव आणि पावन
व्हाव.
धन्यवाद,
जय गणेश!