श्रीकृष्ण जन्मोत्सव (गोकुळ अष्टमी) - शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६; दहीहंडी- शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६; बैलपोळा- गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६; गणेश उत्सव, (गणेश चतुर्थी) श्री मयुरेश्वर अवतार - सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६; अनंत चतुर्दशी (गणेश विसर्जन) - शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६; अंगारकी चतुर्थी- मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६, चंद्रोदय वेळ: रात्री ०८.१० वाजता (पुणे).

आजची प्रतिमा

Dagdusheth Ganpati Today

सुस्वागतम्

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती—भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.

वेळापत्रक

मंदिराच्या वेळा (दररोज)

मंदिराच्या वेळा (दररोज)
  • स. ५ ते रा. १०:३० (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
  • मंदिराची वेळ (मंगळवार)– स. ५ ते रा. ११
  • सुप्रभातम आरती– स. ७.३० ते ७.४५
  • नैवेद्य आरती– दु. १.३० ते १.४५
  • मध्यान्ह आरती– दु. ३.०० ते ३.१५
  • महामंगल आरती– रा. ८.०० ते ९.००
  • शेजारती– रा. १०.३० ते १०.४५

आगामी कार्यक्रम

वार्षिक वेळापत्रक

पुरस्कार आणि सन्मान

पुरस्कार आणि सन्मान

'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय!

शासन निर्णय :- शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, क्र.टीडीएस २०१५/१२/प्र.क्र.१०६५/ पर्यटन, दि.२२ फेब्रुवारी, २०१६ व शुध्दीपत्रक दि.८ मार्च, २०१६ अन्वये राज्यातील “अ” वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी विहित निकष व कार्यपध्दतीस अनुसरुन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे या स्थळास “अ” वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात येत आहे.

वॉलपेपर