महाराष्ट्र दिन सोमवार, दि. ०१ मे २०२५; विनायकी चतुर्थी सोमवार, दि. ०१ मे २०२५; पुष्टीपती विनायक जयंती, शहाळे महोत्सव सोमवार, दि. १२ मे २०२५; सिद्धी जन्मोत्सव सोमवार, दि. १२ मे २०२५; छत्रपती संभाजी महाराज जयंती बुधवार, दि. १४ मे २०२५; संकष्टी चतुर्थी शुक्रवार, दि. १६ मे २०२५ चंद्रोदय वेळ - रात्री १०. १३ वा. ; शेषात्मज (गणेश जयंती) शुक्रवार, दि. ३० मे २०२५.

आजची प्रतिमा

Dagdusheth Ganpati Today

सुस्वागतम्

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती—भक्तांचे लाडके आराध्य-दैवत! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे भक्तांच्या आदर-भक्तीचे स्थान तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन समाजसेवेला आणि सांस्कृतिक संवर्धनाला कृतिशील हातभार लावणारी एक महत्त्वाची संस्था म्हणूनही हे स्थान ओळखले जाते. ’श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’ या नावाने ही कार्ये केली जातात. या मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे.

अनेक वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीत आपला एकुलता एक पुत्र गमावल्यानंतर श्री. दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी ह्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. दरवर्षी केवळ दगडूशेठ यांचे कुटुंबच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील सर्व मंडळी अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असत.

वेळापत्रक

मंदिराच्या वेळा (दररोज)

मंदिराच्या वेळा (दररोज)
  • स. ५ ते रा. १०:३० (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
  • मंदिराची वेळ (मंगळवार)– स. ५ ते रा. ११
  • सुप्रभातम आरती– स. ७.३० ते ७.४५
  • नैवेद्य आरती– दु. १.३० ते १.४५
  • मध्यान्ह आरती– दु. ३.०० ते ३.१५
  • महामंगल आरती– रा. ८.०० ते ९.००
  • शेजारती– रा. १०.३० ते १०.४५

आगामी कार्यक्रम

  • १ मे २०२५, गुरुवार – महाराष्ट्र दिन
  • १ मे २०२५, गुरुवार – विनायकी चतुर्थी
  • १२ मे २०२५, सोमवार – शहाळे महोत्सव
  • १२ मे २०२५, सोमवार – सिद्धी जन्मोत्सव
  • १४ मे २०२५, बुधवार – छत्रपती संभाजी महाराज जयंती
  • १६ मे २०२५, शुक्रवार – संकष्टी चतुर्थी
  • ३० मे २०२५, शुक्रवार – शेषात्मज (गणेश जयंती)

वार्षिक वेळापत्रक

वॉलपेपर